महत्वाच्या घडामोडी

गोव्यात शाळांना 31 मार्चपर्य॔त सुटी : सिनेमागृहे, कॅसिनो, जिमही बंद राहणार!

MahaNews LIVE
Mar 17 / 2020

गोव्यातही कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून येत्या 31 मार्चपर्य॔त शाळा काॅलेजीससह शैक्षणिक संस्था तसेच सिनेमागृहे, कॅसिनो, जिमही बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता गोवा सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था येत्या 31 मार्चपर्य॔त बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत यानी आज घेतलेल्या उच्च स्तरावरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मुख्य सचिव तसेच बहुतेक खात्यांचे सचीव या बैठकीस हजर होते. शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याबरोबरच सिनेमागृहे, कॅसिनो, जिम्सही 31 मार्चपर्य॔त बंद राहणार असून त्यानंतरच एकूण परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले. शाळा कॉलेज व्यवस्थापनानी परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले असल्यास त्यानुसार परीक्षा घेण्यास मात्र मुभा राहील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यात शाळांना 31 मार्चपर्य॔त सुटी : सिनेमागृहे, कॅसिनो, जिमही बंद राहणार!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *