महत्वाच्या घडामोडी

त्यामुळे रावसाहेब दानवेंना तात्काळ अटक करा.

MahaNews LIVE
Oct 23 / 2019

महान्यूज लाईव्ह : भाजपचे केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे लोकांना कायदा तोडण्याच सल्ला देत आहेत तसंच लोकांना कायदा तोडण्यासाठी प्रोत्साहान देत आहेत. लोकांच्या भावनेशी ते खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. एका प्रचासभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावरून आता राजकारणाला सुरूवात झाली आहे.एकीकडे गोहत्येच्या नावावर मुस्लिम समाजाच्या विरोधात मॉबलिंचिंगचे प्रकार घडत आहेत. तर दुसरीकडे मुस्लिम मतांवर डोळा ठेवून गोहत्या करा, असं भर सभेत भाजपचे मंत्री सांगत आहेत. भारत कुठल्या दिशेने जात आहे? असा सवाल मलिक यांनी केला आहे.दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अश्या मंत्र्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे. दुसरीकडे मी असं बोललोच नाही. त्या क्लिपमध्ये कुणीतरी छेडछाड केली आहे, असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे रावसाहेब दानवेंना तात्काळ अटक करा.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *