महत्वाच्या घडामोडी

भाजपला शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही...!

MahaNews LIVE
Oct 23 / 2019

महान्यूज लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही अवघे तास उरले असताना विविध पक्षातील नेते आपले मतं व्यक्त करताना दिसत आहेत.शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही.भाजपने दोन-पाच जागा जिंकल्या तरी ते शिवसेनेशिवाय राज्य करु शकणार नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.पत्रकारांशी बोलतांना संजय राऊत हे म्हणाले की,मी गुळगुळीत बोलत नाही.मी अनेक वर्ष शिवसेनेत आहे.शिवसेनेचं काम करत आहे.बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे,त्यापलीकडे माझं पाऊल पडणार नाही.शिवसेना पुढील सत्तेतही राहील.कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं शक्य नाही.उद्याच्या निकालानंतर शिवसेना काय आहे ते कळेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले आहे.

भाजपला शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही...!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *