महत्वाच्या घडामोडी

कर्जतमध्ये झळकले रोहित पवारांच्या विजयाचे फलक

MahaNews LIVE
Oct 23 / 2019

महान्यूज लाईव्ह : राज्यातील विधानसभा निवडुकीच्या निकालाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. परंतु उत्साही कार्यकर्त्यांना तो विरह देखील सहन होत नसल्याचे चित्र आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या तसेच राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेची निवडणूक केलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात रोहित पवार विजयी झाल्याचे फलक लगावले आहेत.मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्यादिवशी पुण्यातील सिद्धार्थ शिरोळे आणि इतर चार उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या विजयाचे फलक लावले आहेत. तर काहींनी थेट गुलाल उधळत मिरवणूक ही काढलीये. त्या प्रमाणेच कर्जत मध्ये देखील रोहित पवार हे प्रचंड बहुमताने निवडून आले असल्याचे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले आहेत. तसेच मिरवणुकीसाठी डीजे ला ईसार ही देण्यात आल्याचे बोलले जात आहे.दरम्यान कर्जत जामखेड मतदार संघात भाजपचे मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या मतदार संघाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जामखेड शहरात विक्रमी मतदांना झाल्याने दोनही उमेदवारांची धाकधूक वाढली असल्याचं बोललं जात आहे. उद्या निकालानंतर जामखेडची जनता कुणाच्या गळ्यात विजयची माळ टाकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कर्जतमध्ये झळकले रोहित पवारांच्या विजयाचे फलक
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *