महत्वाच्या घडामोडी

या मतदारसंघात मनसेचे इंजिन गुलाल उधळू शकतं !

MahaNews LIVE
Oct 23 / 2019

महान्यूज लाईव्ह : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी आपापले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. यामध्ये बहुतांशी एक्झिट पोलने मनसेला 1 किंवा 2 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या दोन जागांवर मनसेचे उमेदवार विजयी होऊ शकतात, असा अंदाज लावला जात आहे.कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली होती. परंतू याच मतदारसंघातले भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करत भोईर यांच्यापुढे आव्हान उभं केलंय. त्यामुळे पवार यांच्या बंडखोरीचा फायदा मनसेचे उमेदवार प्रकाश भोईर यांना होऊ शकतो आणि ते विजयाच्या दिशेने कूच करू शकतात, असा अंदाज बांधला जातोय. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून विदयमान सेना आमदार सुभाष भोईर आणि रमेश म्हात्रे यांच्यात चुरस होती. सेनेकडून रमेश म्हात्रे आणि भोईर या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले. म्हात्रे यांनी याप्रकरणी आपली नाराजी शिवसेना पक्षप्रमुखांना बोलून दाखवली. आणि भोईरांना माघार घ्यायला सांगून सेनेने म्हात्रे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. मनसेने या मतदारसंघात राजू पाटील यांना उमेदवारी दिली. आणि या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार न देता मनसेला पाठिंबा दिला आहे. म्हणून राजू पाटील यांचं पारडं जड मानलं जात आहे.निकालाला अवघे काही तास उरले आहेत. मनसे किती जागा जिंकणार आणि कोणत्या उमेदवारांना गुलाल खेळण्याची संधी मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या मतदारसंघात मनसेचे इंजिन गुलाल उधळू शकतं !
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *