महत्वाच्या घडामोडी

...म्हणून साताऱ्यातील निकालाला लागणार १२ तास वेळ

MahaNews LIVE
Oct 23 / 2019

महान्यूज लाईव्ह सातारा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर संपूर्ण राज्याला आता निकालाची प्रतिक्षा लागलेली असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघात काय होणार याचीही उत्सुकता राज्यभरात आहे. दोन्हीही उमेद्वार तुल्यबळ होते. अतिशय अटीतटीने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.परंतु साताऱ्यातील निवडणुकीच्या निकालाला वेळ लागण्याची शक्यता आहे. लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजनीमुळे सर्वच निकालांना उशीर होणार आहे. किमान १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे. लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि साताऱ्यातून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सातारा लोकसभेची पोटनिवडणूककही विधानसभेसोबत झाली. त्यामुळे विधानसभेत सोबतच सातारा पोटनिवडणूकीकडे ही साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

...म्हणून साताऱ्यातील निकालाला लागणार १२ तास वेळ
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *