महत्वाच्या घडामोडी

रोहिणी खडसे १५ हजार मतांनी जिंकून येणार :एकनाथ खडसे

MahaNews LIVE
Oct 23 / 2019

महान्यूज लाईव्ह : महाराष्ट्रात पुन्हा भाजप – शिवसेना युतीचेचं सरकार येणार असून रोहिणी खडसे या १५ हजार मतांनी जिंकणार आहेत, असा विश्वास भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.खडसे म्हणाले, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे काळ्या दगडावरची रेष आहे. त्यात काही दुमत असू शकणार नाही. एक्झिट पोलच्या आकडेवारी नुसार भाजप सेनेला 200च्या वर जागा मिळणार आहेत. त्यामुळे युतीची सत्ता अबाधित राहणार आहे. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरच्या भाजप उमेदवार रोहिणी खडसे या निवडणुकीत १५ हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत. तसेच बंडखोरी कमी असती तर भाजपच्या आणखी 4 – 5 जागा वाढल्या असत्या, असेही खडसे म्हणाले,दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. राज्यभरात एका टप्यात मतदान पार पाडले. काही ठिकाणी पावसाचे सावट असल्याने मतदानाचा टक्का काहीसा घसरताना दिसला. तर शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागात मतदान मोठ्या प्रमाणात झाले आहे. येत्या 24 तारखेला म्हणजे उद्या मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे. हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

रोहिणी खडसे १५ हजार मतांनी जिंकून येणार :एकनाथ खडसे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *