महत्वाच्या घडामोडी

कोल्हापूरजवळ सापडला गावठी हातबाँबचा कारखाना

MahaNews LIVE
Oct 23 / 2019

पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोल्हापूरनजीक असणाऱ्या उजळाईवाडी येथे चार दिवसापूर्वी गावठी हात बॉम्बचा स्फोट होऊन एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा छडा लावण्यास कोल्हापुरातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे.हातकणंगले तालुक्यातील मालेमुडशिंगी इथं छापा घालून पोलिसांनी गावठी हात बॉम्ब बनवण्याचा कारखाना उघडकीला आणला असून, याप्रकरणी विलास आणि आनंदा राजाराम जाधव या दोघा बंधूंना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 69 गावठी हात बॉम्ब जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सातहजार रुपये इतकी आहे. हे गावठी हातबॉम्ब रानडुकराच्या शिकारीसाठी तयार करण्यात येत असल्याची कबूली जाधव बंधूंनी दिली आहे.ही माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख आणि पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनीपत्रकार परिषदेत दिली दरम्यान, अशाच प्रकारचे एक प्रकरण कर्नाटकमध्ये उघडकीला आलं असून, त्याचं तपास चालू आहे.

कोल्हापूरजवळ सापडला गावठी हातबाँबचा कारखाना
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *