महत्वाच्या घडामोडी

सभा सुरु असताना पंकजा मुंडे स्टेजवर कोसळल्या

MahaNews LIVE
Oct 19 / 2019

महान्यूज लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा झंझावात आज संपणार आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांची सांगता सभा परळी येथे सुरू असताना त्या चक्कर येऊन मंचावर कोसळल्या. या प्रकाराने सभास्थळी लोकांची धांदल उडाली.पंकजा मुंडे चक्कर येऊन मंचावर कोसळल्यानंतर काही काळ त्या मंचावर बसून राहिल्या. काही मिनिटानंतर त्यांना नजिकच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.गेले महिनाभर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरत होत्या. तसंच परळीत देखील त्यांच्या प्रचाराचा झंझावत सुरू होता. एकूणच गेल्या महिनाभरात प्रचंड धावपळ झाल्याने त्यांना भोवळ आली असल्याचं सांगितलं जातंय.दरम्यान, पंकजा यांना जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सभा सुरु असताना पंकजा मुंडे स्टेजवर कोसळल्या
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *