महत्वाच्या घडामोडी

अन पुन्हा शरद पवारांना वरुणराजाचा अभिषेक

MahaNews LIVE
Oct 19 / 2019

महान्यूज लाईव्ह : अहमदनगरच्या कर्जत-जामखेडमध्ये आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार आणि अमित शहा या दोघांच्या सभा होत्या. यावेळी दोन्ही पक्षांचे अध्यक्ष एकमेकांसमोर उभे ठाकणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शरद पवारांची सभा सकाळीच झाली. यावेळी देखील साताऱ्याच्या सभेप्रमाणेच पाऊस कोसळत होता. मात्र, शरद पवारांनी पावसातच भाषण सुरू ठेवलं. रोहीत पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.दरम्यान, शरद पवारांच्या सभेनंतर दुपारी अमित शहांची सभा होती. मात्र, पाऊस पडत असल्यामुळे अमित शहांनी ही सभाच रद्द करून माघारी परतणं पसंत केलं. त्यामुळे जिथे शरद पवारांनी सभा घेतली, तिथे अमित शहांनी मात्र पावसाला पाहून काढता पाय घेतल्याची चर्चा कर्जत-जामखेडमध्ये रंगली होती. कर्जत-जामखेडमझून शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपकडून विद्यमान मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.

अन पुन्हा शरद पवारांना वरुणराजाचा अभिषेक
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *