महत्वाच्या घडामोडी

अमित शहांची सभा रद्द.

MahaNews LIVE
Oct 19 / 2019

महान्यूज लाईव्ह : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्यामध्ये भर पावसात सभेत भाषण करत असल्याचा व्हिडिओ आणि त्यासंदर्भातलं वृत्त राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं होतं. पावसात भिजणारी शरद पवारांची छबी दिवसभर सोशल मीडियावर चर्चेत होती. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भर पावसात देखील सभा घेत असताना भाजपच्या अध्यक्षांनी मात्र पावसामुळे सभा रद्द केल्याचं चित्र आहे. त्याच ठिकाणी सकाळी पाऊस पडत असून सुद्धा पुन्हा एकदा शरद पवारांनी सभा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. अमित शहांनी मात्र पावसामुळे आपली सभाच रद्द केली. त्यामुळे या दोघांच्या सभांची आता सोशल मीडियावर तुलना होऊ लागली आहे.दरम्यान शहांची रद्द झालेली सभा विरोधकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

अमित शहांची सभा रद्द.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *