महत्वाच्या घडामोडी

पावसातील सभेनंतर शरद पवारांनी साजरा केला शशिकांत शिंदेंचा वाढदिवस .

MahaNews LIVE
Oct 19 / 2019

महान्यूज लाईव्ह : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारची साताऱ्यातील सभा चांगलीच गाजली. वरुनराजा बरसत असताना देखील पवारांनी विरोधकांवर बरसन बंद केलं नाही.त्या सभेत भाषण करुन लाखोंची मने जिंकली , तरुणांना भुरळ घातली . सभेनंतर पवार प्रीत हॉटेलवर परतले. येथे त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला.80 वर्षांच्या शरद पवारांचा उत्साह तरुणांनाही लाजवणार ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत पवारांनी एकहाती प्रचाराचा धडाका लावला. सर्वत्र फिरुन त्यांनी राज्य पिंजून काढलं. काल साताऱ्यातील सभेत तर त्यांनी त्यांच्या लढाऊपणाचं दर्शन घडवलं.शरद पवार जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा पाऊस सुरु झाला होता. असंख्य उपस्थित कार्यकर्ते यावेळी पवाराचं भाषण ऐकण्यासाठी पावसात भिजत थांबले होते. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून पवार भाषणासाठी उभे राहिले आणि ऐतिहासिक घटना घडून आली.भाषणानंतर पवार प्रीत हाॅटेलवर परतले. सर्व आवरुन ते पुन्हा तयार झाले. कोरेगावचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. त्यानंतर सकाळी उठून ते पुन्हा प्रचारासाठी निघून गेले.

पावसातील सभेनंतर शरद पवारांनी साजरा केला शशिकांत शिंदेंचा वाढदिवस .
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *