महत्वाच्या घडामोडी

कर्जतमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांच्यात रंगणार कलगी तुरा .

MahaNews LIVE
Oct 19 / 2019

महान्यूज लाईव्ह : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. उद्या सांयकाळी प्रचाराची सांगता होणार असून प्रा. शिंदे यांच्या प्रचाराची सांगता सभा कर्जतमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता तर रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कर्जत शहरात सभा सुरु आहे.कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. ही लढत चुरशी होणार असून दोन्ही पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या सभांनी मतदारसंघ ढवळून काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, खासदार उदयनराजे भोसले यांच्या सभा झाल्या आहेत.

कर्जतमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांच्यात रंगणार कलगी तुरा .
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *