महत्वाच्या घडामोडी

उद्धव ठाकरेंची माण-खटाव येथील सभा उद्यावर .

MahaNews LIVE
Oct 18 / 2019

महान्यूज लाईव्ह सातारा-खटाव : विधानसभेच्या निवडणूकी निमित्त शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी 10 वाजता दहिवडी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. परंतू खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण मुंबईतून न होवू शकल्याने ते दहिवडी येथे पोहोचू न शकल्याने त्यांची आज होणारी सभा रद्द झाली.आज सकाळी माण येथील इंगळे मैदानावर शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. .खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण मुंबईतून न होवू शकल्याने उद्धव ठाकरे निर्धारित वेळेत सभेसाठी दहिवडीत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या भ्रमणध्वनीवरुन सभेसाठी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले.या सभेस उपस्थित असलेल्या लोकांना स्वतः उध्दव ठाकरे यांनी फोन वरून मार्गदर्शन करत नाराज होऊ नका मी उद्या सकाळी दहा वाजता आपल्या भेटीला नक्की येणार आहे. तसेच माझ्या न येण्याचा कोणी ही वेगळा अर्थ काढू नका. उध्दव ठाकरे कधी कोणा बरोबर सेटिंग करत नाही आपले अधिकृत उमेदवार शेखर गोरे हेच असून यांना आपण आमदार करायचं आहे असे जनसमुदायाला म्हटले. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांनीही उद्याच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही माण-खटावच्या मतदारांना केले.

उद्धव ठाकरेंची माण-खटाव येथील सभा उद्यावर .
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *