महत्वाच्या घडामोडी

पुणे महापालिकेसमोर सापडला तरुणाचा मृतदेह

MahaNews LIVE
Oct 18 / 2019

महान्यूज लाईव्ह पुणे : पुणे महापालिकेसमोर नग्नावस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून कऱण्यात आला. गुरुवारी (दि.17) रात्री ही घटना घडली असून सुजन मंडल (वय 30) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर असलेल्या पादचारी पुलावर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.प्राथमिक माहितीनुसार मृत तरुण पश्चिम बंगालचा रहिवाशी आहे. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले असून मृतदेह नग्नावस्थेत आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पुणे महापालिकेसमोर सापडला तरुणाचा मृतदेह
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *