शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी : बंडखोरीमुळे केली हकालपट्टी.
MahaNews LIVE
महान्यूज लाईव्ह मुंबई : पक्षकडून तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी केली. शिवसेनेलाही बंडखोरीच ग्रहण लागलं आहे. मात्र शिवसेनेने बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याच पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातीळ शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत पक्षातून हकालपट्टी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून हे वृत्त देण्यात आले आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार असूनही आपल्याला उमेदवारी डावलल्याने तृप्ती सावंत नाराज होत्या.उद्धव ठाकरे हे तृप्ती सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने यंदा या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती मिळते. तृप्ती सावंत यांचे पती तत्कालीन आमदार प्रकाश बाळा सावंत यांच्या निधनानंतर झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांचा तब्बल १९,००० मतांनी पराभव करून निवडून आल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभेत शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज तृप्ती सावंत यांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.

- Comments
- Leave your comment