महत्वाच्या घडामोडी

ऐ लाव रे तो व्हिडीओचा दुसरा भाग उद्या हडपसरमध्ये पहायला मिळणार

MahaNews LIVE
Oct 17 / 2019

महान्यूज लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेले मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी उद्या राज ठाकरे हडपसरमध्ये सभा घेत आहेत. राज ठाकरेंची तोफ उद्या विरोधकांवर धडाडणार असून ऐ लाव रे तो व्हिडीओचा दुसरा भाग पहायला मिळणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील बंटर हायस्कूलच्या पटांगणामध्ये सायंकाळी सहा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये लाव रे तो व्हिडीओचा दुसरा भाग लवकरच दाखवेन असे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. ऐ लाव रे तो व्हिडीओ, लागणार भाग दोन, विद्यमानांची होणार पोलखोल, मग येताय ना व्हिडीओ पहायला ? असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडपसर विधानसभा मतदारसंघातर्फे करण्यात आले आहे. हडपसरचा कायापालट करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी असे आवाहन वसंत मोरे यांनी मतदारांना केले आहे.उद्या होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेमध्ये कोणता व्हिडीओ दाखवून विरोधकांची पोलखोल करणार याची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये आहे. उद्या राज ठाकरे कोणत्या मुद्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये वसंत मोरे यांना आमदार करण्याचा निर्धार हडपसर मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे. वसंत मोरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.

ऐ लाव रे तो व्हिडीओचा दुसरा भाग उद्या हडपसरमध्ये पहायला मिळणार
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *