महत्वाच्या घडामोडी

नागपूरचं बोचकं नागपूरला परत पाठवा : खासदार अमोल कोल्हे

MahaNews LIVE
Oct 17 / 2019

महान्यूज लाईव्ह : आपल्याकडे शाळेत नापास झाले की बापाला बोलावले जाते. तशीच अवस्था सध्या मुख्यमंत्र्यांची झाली आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मोदी-शाह महाराष्ट्रात येत आहेत. हे नागपूरचे बोचकं परत नागपूरला पाठवा, असे आवाहन करून खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला.कर्जत - जामखेडच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी येथे आलेले पार्सल परत पाठवा, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना खासदार कोल्हे हे मिरजगाव येथील सभेत बोलताना म्हणाले , गेल्या 5 वर्षांची स्वतःचीच कारकीर्द पाहून मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडला असेल, की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे. त्यामुळे नागपूरचे बोचकं परत नागपूरला पाठवा. मुख्यमंत्री पदाचा आदर आहे.मात्र, फडणवीस हे पुढून मागून कसेही बघितले तर पैलवान दिसत नाहीत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र, आमच्यासोबत लढायला कोणीच नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्यालाही कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले.

नागपूरचं बोचकं नागपूरला परत पाठवा : खासदार अमोल कोल्हे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *