महत्वाच्या घडामोडी

शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचं पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा.

MahaNews LIVE
Oct 17 / 2019

महान्यूज लाईव्ह : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे. त्यावरुन काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत ट्वीटवरुन रोष व्यक्त केला आहे.ऐतिहासिक गड-किल्ले विकायला काढले आणि आता शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचं पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, अशा शब्दांत अशोक चव्हाणांनी आपला राग व्यक्त केला आहे.भाजप-शिवसेना सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली. स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार केला. कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचं नाव देऊन लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोपही चव्हाणांनी केला आहे.म्हणून मी देशातील आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती करतो की हीच ती वेळ आहे हे सरकार घालवण्याची. त्यामुळे एकत्र येऊन शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या सरकारला या महाराष्ट्रातून हद्दपार करुयात, असं चव्हाण म्हणाले आहेत.

शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचं पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *