महत्वाच्या घडामोडी

१० रुपयाच्या थाळीची राजकीय पक्षांसह नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली.

MahaNews LIVE
Oct 17 / 2019

महान्यूज लाईव्ह : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी आपआपले जाहीरनामे जाहीर केले आहेत. त्यामध्ये शिवसेनेने १० रुपयात जेवण देण्याची घोषणा केली आहे.शिवसेनेने जाहीर केलेल्या १० रुपयाच्या थाळीची नेटकऱ्यांसह राजकीय पक्षांनी खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्राचा युवक सांगतो 10 रुपयांची भीक आमच्या समोर टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झालेला नाही. मनगटात ताकद आहे. हिम्मत द्यायचीच असेल, तर 10 रुपयांच्या थाळीची भीक देऊ नका. आमच्या हक्काचा रोजगार द्या. रोजगार दिला, तर 10 रुपयाची काय, 100 रुपयांची थाळी घेण्याची आमची कुवत आहे, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या 10 रुपयांच्या थाळीवर कडाडून टीका केली आहे.तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी देखील याच मुद्द्यावरून शरसंधान केले आहे. शिवसेना-भाजप ताट वाट्या घेऊन फिरत आहे.कोणी म्हणतो १० रुपयात जेवण तर कुणी ५ रुपयात जेवण देण्याचे म्हणतो आहे.महाराष्ट्र भिकेला लागला आहे का ?असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, खा. नारायण राणे यांनी सुद्धा सेनेवर या मुद्द्यावरून टीका केली. नारायण राणे यांनी शिवसेनेच्या या घोषणेवर भाष्य करताना शिवसेनेने त्यांच्या वचननाम्यात १० रुपयात थाळी अशी घोषणा केली आहे. पण ही थाळी मातोश्री वर बनवून देणार का? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला विचारला आहे.

१० रुपयाच्या थाळीची राजकीय पक्षांसह नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *