महत्वाच्या घडामोडी

मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवणार : अमित शहा

MahaNews LIVE
Oct 17 / 2019

महान्यूज लाईव्ह : महाराष्ट्रात शिवसेना- भाजप युतीला बहुमत मिळेल यात कोणतीही शंका नाही. परंतु भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल, असा विश्वासदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.राज्यात शिवसेना भाजप युती असली तरी राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच असेल तसेच उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम घेईल असं म्हणत अमित शहांनी यावेळी पुढचे मुख्यमंत्री कोण असतील याचेही संकेत दिले आहेत.शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा दावा केल्याने युतीला धोका आहे असं मी मानत नाही. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदि विराजमान होतील ही बाब स्पष्ट आहे, असं अमित शहांनी नमूद केलं.लोकसभा आम्ही एकत्र लढलो होतो आणि विजयी झालो होतो. आता विधानसभेतही आम्ही एकत्र लढत आहोत आणि आम्ही नक्की विजयी होऊ, असं शहा म्हणाले.

मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवणार : अमित शहा
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *