सातारा

जयकुमार गोरेंना मोठा फटका : खंद्या शिलेदारांनी दिला प्रभाकर देशमुखांना पाठिंबा.

MahaNews LIVE
Oct 16 / 2019

महान्यूज लाईव्ह सातारा : २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरेंच्या समर्थकांनी जीवाचं राण करुन त्यांना निवडून आणलं होतं. मात्र त्याच कार्यकर्त्यांनी गोरेंच्या अंहकारी वृत्तीला कंटाळून त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोरे गटाला खिंडार पडले आहे.गोरेंची साथ सोडलेल्या या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच देशमुखांना निवडून आणणारच असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे जयकुमार गोरेंसाठी हा मोठा धक्का आहे.मार्केट कमेटीचे माजी सभापती आशोकआबा गोडसे, मार्केट कमेटीचे संचालक काकासाहेब मोरे, माजी नगराध्यक्ष महेश गुरव, माजी पंचायत समितीचे सदस्य नंदकुमार गोडसे, खटाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विवेक देशमुख, सचिन घाडगे, रणजित देशमुख आदींनी प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.दरम्यान, मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असताना कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे गोरेंना मोठा धक्का बसला आहे. तर प्रभाकर देशमुखांना दिलासा मिळाला आहे.

जयकुमार गोरेंना मोठा फटका : खंद्या शिलेदारांनी दिला प्रभाकर देशमुखांना पाठिंबा.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *