सातारा

कितीही सेटलमेंट केल्या तरी बाकुणी जी पलटवणारच : शशिकांत शिंदे

MahaNews LIVE
Oct 16 / 2019

कितीही सेटलमेंट केल्या तरी बाकुणी जी पलटवणारच : शशिकांत शिंदे महान्यूज लाईव्ह सातारा : माझ्याविरोधात साताऱ्यात एका हॉटेलमध्ये कारस्थान सुरू असल्याचं मला एका व्हीडिओमधून समजलं. ज्यांच्यासाठी पक्षाविरोधात जाऊन मी एवढं केलं ते ही विश्वासघात करतात. पण कुणी कितीही सेटलमेंट केल्या तरी बाजी पलटवणारच, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.साताऱ्यातल्या हॉटेलमध्ये दोन उमेदवारांना घेऊन सेटलमेंट सुरू असल्याचा व्हीडिओ माझ्याकडे आला आहे. मीडियाच्या लोकांनाही धमकावलं गेलंय.माझ्याविरोधात कारस्थान रचण्याचं काम सुरू होतं. आता ते बाहेर आलंय. जनता सेटलमेंटला स्विकारणार नाही, असं शिंदे म्हणाले.जनतेचे आशीर्वाद आणि शरद पवारांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.कोरेगावची जनता कारस्थानांना बळी पडणार नाही, असंही शिंदे म्हणाले.दरम्यान, जेव्हा सगळा पक्ष त्यांच्याविरोधात होता तेव्हा मी छातीचा कोट करून मी त्यांच्यासाठी लढलो. पण तेच लोक आता असे वागत असतील तर दुर्दैव आणखी काय असू शकतं? असं म्हणत त्यांनी उदयनराजेंना टोला लगावला.

कितीही सेटलमेंट केल्या तरी बाकुणी जी पलटवणारच : शशिकांत शिंदे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *