सातारा

३७० चा काय संबंध असा सवाल करणाऱ्यांनी देशात राहू नये : उदयनराजे भोसले.

MahaNews LIVE
Oct 16 / 2019

महान्यूज लाईव्ह सातारा : विधानसभा निवडणूक ३७० च्या मुद्द्यावर लढवली जात आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत ३७० चा काय संबंध असा सवाल करणाऱ्यांनी देशात राहू नये, असा सल्ला माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.भाजप ३७० चा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीचा प्रचार करत आहे. यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही यावरुन मोदींना लक्ष केले होते. यावरुन उदयनराजेंनी विरोधकांवर टीका केली आहे.जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्या बलिदानाबद्दल विरोधकांना काही वाटत नाही का? काश्मीरचा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या काय संबंध असा सवाल करणाऱ्यांना लाज वाटायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.काश्मीरमध्ये अनेक जवानांनी बलिदान दिलं. मात्र, आता कलम ३७० हटवल्यामुळे देशात शांतता नांदेल. आमचे जवान आता सुखरुप असतील, असंही उदयनजे यांनी म्हटलं आहे.

३७० चा काय संबंध असा सवाल करणाऱ्यांनी देशात राहू नये : उदयनराजे भोसले.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *