महत्वाच्या घडामोडी

त्यांनी हातात बांगड्या घातल्या पाहिजे ; शरद पवारांनी बबनराव पाचपुतेंवर डागली तोफ.

MahaNews LIVE
Oct 16 / 2019

महान्यूज लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चांगलीच चढलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होऊन श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागली आहे.पाचपुते हे बिनकामाचे मंत्री होते. राष्ट्रवादीने त्यांना वनमंत्री, आदिवासी मंत्री केले. १३ वर्षं मंत्रिपद दिले. इतकी वर्षे मंत्रिपद मिळूनही त्यांना काही करता आले नसेल तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजेत, अशी खोचक टीका शरद पवारांनी केली आहे.पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केलं. मात्र त्यांनी त्या संस्थेत बसून राजकारण करायला लागले होते. शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील जाहीर सभेत बबनराव पाचपुतेंना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला.पाचपुतेंनी खासगी कारखाने काढून वर्षांनुवर्षे ऊस उत्पादकांचे, कामगारांचे पैसे थकविले. ऊस उत्पादकांचे पैसे न देता उमेदवार म्हणून ते लोकांपुढं जात आहेत. लोकांनी त्यांना धडा शिकवावा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.

त्यांनी हातात बांगड्या घातल्या पाहिजे ; शरद पवारांनी बबनराव पाचपुतेंवर डागली तोफ.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *