महत्वाच्या घडामोडी

अखेर राणेंचा स्वाभिमान भाजपमध्ये विलीन.

MahaNews LIVE
Oct 15 / 2019

महान्यूज लाईव्ह : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भाजपमध्ये विलीन झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत नारायण राणे यांनी पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचं जाहीर केलं. कणकवलीत भाजपकडून नितेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नितेश राणेंनी विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना कणकवलीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी कणकवलीत प्रचारसभा घेतली.निलेश राणे यांनीही कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नारायण राणेंचं कौतुक केलं. राणेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं स्थान आहे. त्यांना सर्व विषयाची जाण आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाला शिवसेनेकडून मोठा विरोध होत होता. अखेर महायुती झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संधी साधून नारायण राणेंचा पक्षप्रवेश करुन घेतला आहे.

अखेर राणेंचा स्वाभिमान भाजपमध्ये विलीन.
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *