हटके

किंग खान वाढदिवशी तब्बल 2 चित्रपटांची घोषणा करण्याची शक्यता.

MahaNews LIVE
Oct 15 / 2019

महान्यूज लाईव्ह : झिरो चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान झळकला नाही. आत्तापर्यंत कोणत्याही चित्रपटाची घोषणा त्याने न केल्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या चित्रपटासाठी मोठी आतुरता पाहायला मिळते. शाहरुखकडे सोशल मीडियावर विविध हॅशटॅग वापरून चित्रपटाच्या घोषणेसाठी मागणीही करण्यात येत असल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एक नाही, तर दोन चित्रपटांची घोषणा शाहरुख करणार आहे. २ नोव्हेंबरला शाहरुखचा ५४ वा वाढदिवस आहे. यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटांची घोषणा शाहरुख करणार आहे. तो दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटामध्ये भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर, त्याची वर्णी एस. शंकर यांच्याही एका चित्रपटात लागली आहे. शाहरुखने काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात सांगितले होते, की लवकरच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा तो करणार आहे. तो चित्रपटाच्या कथानकावर सध्या काम करत असल्यामुळे तो त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईझ देऊ शकतो, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

किंग खान वाढदिवशी तब्बल 2 चित्रपटांची घोषणा करण्याची शक्यता.
Categories : हटके Tags : हटके
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *