महत्वाच्या घडामोडी

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करु

MahaNews LIVE
Oct 15 / 2019

महान्यूज लाईव्ह मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मंगळवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे. तसंच महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वसन भाजपनं दिलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत या संकल्प पत्राचे प्रकाशन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये 5 आयटीपार्क उभारणार, धनगर समाजाला 1000 कोटींचे विशेष पॅकेज तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ही आणि अशी बरीच आश्वासनं भाजपने दिली आहेत.दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र भाजपच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे. 2014 ला देखील तुम्ही हीच आश्वासन महाराष्ट्राला दिली होती. मग तुम्ही 5 वर्ष काय केलं? असं काँग्रेस राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करु
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *