महत्वाच्या घडामोडी

कोल्हापुरात ७९ उमेदवारांची माघार ; १० मतदार संघात १०६ उमेदवार - जिल्हाधिकारी दौलत देसाई

MahaNews LIVE
Oct 08 / 2019

महान्यूज लाईव्ह कोल्हापूर : विधानसभा मतदार संघात अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 79 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 106 उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. चंदगडमधून 20 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार, राधानगरी मधून 10 जणांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार, कागल मधून 5 जणांनी माघार घेतल्याने 6 उमेदवार, कोल्हापूर(दक्षिण) मधून 4 जणांनी माघार घेतल्याने 8 उमेदवार, करवीर मधून एकाने माघार घेतल्याने 8 उमेदवार, कोल्हापूर(उत्तर) मधून 4 जणांनी माघार घेतल्याने 8 उमेदवार, शाहुवाडी मधून 3 जणांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार, हातकणंगले (अ.जा.) मधून 13 जणांनी माघार घेतल्याने 16 उमेदवार, इचलकरंजी मधून 3 जणांनी माघार घेतल्याने 14 उमेदवार आणि शिरोळ मधून 16 जणांनी माघार घेतल्याने 9 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

कोल्हापुरात ७९ उमेदवारांची माघार ; १० मतदार संघात १०६ उमेदवार - जिल्हाधिकारी दौलत देसाई
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *