महत्वाच्या घडामोडी

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ; पण कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी सेफ....!

MahaNews LIVE
Oct 06 / 2019

महान्यूज लाईव्ह : कर्जत-जामखेड मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी, तालुका पाटोदा) यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांचाच उमेदवारी अर्ज बाद झाल्याची अफवा पसरली होती. अपक्ष उमेदवार रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज छाननीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. रोहित पवार यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात अपूर्ण माहिती दिली होती. कर्जत-जामखेड मतदारसंघात एकूण 27 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. प्रांताधिकारी कार्यालयाकडून आलेल्या अधिकृत माहितीत या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे.

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ; पण कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी सेफ....!
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *