महत्वाच्या घडामोडी

सोलापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नाराज ; रश्मी बागल यांचे काम न करण्याचा दिला इशारा

MahaNews LIVE
Oct 05 / 2019

महान्यूज लाईव्ह :सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या एकमेव आमदार असलेले नारायण पाटील यांची करमाळा विधानसभा मतदारसंघातून पक्की असलेली उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. विद्यमान आमदारांऐवजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीमधून आयात केलेल्या रश्मी बागल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे करमाळ्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज आहेत. तानाजी सावंतांच्या खेळीमुळे उमेदवारी कापली गेल्याचं नारायण पाटील यांनी म्हटले. नारायण पाटील यांना डावलल्यामुळे करमाळ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आता रश्मी बागल यांचे काम न करण्याचा इशारा दिलेला आहे.

सोलापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते नाराज ; रश्मी बागल यांचे काम न करण्याचा दिला इशारा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *