महत्वाच्या घडामोडी

पुण्यात आघाडीत बंडखोरी ; युतीलाही लागलं बंडखोरीच ग्रहण .

MahaNews LIVE
Oct 05 / 2019

महान्यूज लाईव्ह : पुणे शहरात तीन मतदारासंघात काँग्रेसच्या इच्छुकांनी आघाडीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्याविरोधात काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. कॅन्टोन्मेंट आणि कसबा मतदार संघात काँग्रेसच्या इच्छुकांनी त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केलीय. सदानंद शेट्टी यांनी रमेश बागवेंविरोधात तर कमल व्यवहारे यांनी अरविंद शिंदेंविरोधात बंड पुकारलंय. पुण्यातील ६ मतदारसंघात प्रमुख पक्षांचे १० बंडखोर रिंगणात आहेत.

पुण्यात आघाडीत बंडखोरी ; युतीलाही लागलं बंडखोरीच ग्रहण .
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *