सातारा

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील आमने-सामने ...!

MahaNews LIVE
Oct 01 / 2019

महान्यूज लाईव्ह ( सातारा ) : सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये सिक्कीमचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध राज्यपाल श्रीनिवास पाटील असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने श्रीनिवास पाटील 3 ऑक्टोबराल उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू होत्या.परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना मंगळवारी फोन करून श्रीनिवास पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा अशी सूचना केली आहे. 3 ऑक्टोबर रोजी पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले सगळे उमेदवार यावेळी उपस्थित राहणार आहेत

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील आमने-सामने ...!
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *