महत्वाच्या घडामोडी

आम्ही कॉंग्रेस कार्यकर्ते सदैव अजित यशवंतरावांसोबत :मनोहर सप्रे

MahaNews LIVE
Oct 01 / 2019

महान्यूज लाईव्ह ( रत्नागिरी ) : आघाडीच्या ठरलेल्या धोरणाप्रमाणे 267 राजापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते.या मतदारसंघातून युवा नेते अजित यशवंतराव यांनी गेली साडेचार वर्षे आघाडीतील सर्व स्तरातील कार्यकर्त्याना एकत्र घेऊन विरोधकांना मतदारसंघात तगडे आव्हान निर्माण केले आहे.त्यांना या मतदारसंघातून आघाडीकडून अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील काही स्वयंघोषित नेत्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस संपविण्याचा ठेका घेतल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला जोरदारपणे विरोध करण्याचे काम सुरू केले आहे .त्यातच त्यांच्या आजारपणाचा फार मोठा बाऊ केला जात आहे. या मतदारसंघातुन आघाडीकडून अजित यशवंतराव यांना उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेस पक्षाचे जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते आपली ताकद दाखवून देतील.लोकसभा निवडणूकित पक्षाची वाताहत झाली आहे .असे असतानाही पक्षाने यात बदल न केल्यास या मतदारसंघातील कार्यकर्ते विधानसभेत आपली ताकद दाखवून देतील असे मत जिल्हा बँकेचे संचालक मनोहर सप्रे यांनी व्यक्त केले.

आम्ही कॉंग्रेस कार्यकर्ते सदैव अजित यशवंतरावांसोबत :मनोहर सप्रे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *