सातारा

शरद पवारांचं पंतप्रधान होण्याच स्वप्न मी पूर्ण करेन: अभिजीत बिचुकले

MahaNews LIVE
Oct 01 / 2019

महान्यूज लाईव्ह ( सातारा ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न मी पूर्ण करून दाखवेन.असे मत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी केले आहे. त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.मी स्वत: पंतप्रधान होईन,आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवीन असंही ते म्हणाले .साताऱ्यातील विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक या दोन्हीसाठी मी अर्ज करणार आहे. या जिल्ह्याने शरद पवारांना मोठं केलं. त्यामुळे सातारकर मलाही मोठं करतील, असा विश्वास बिचुकलेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार असल्याचं अभिजित बिचुकले यांनी सांगितले होते. मात्र आता 288 जागा लढवण्यासाठी सध्यातरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असं बिचुकले यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांचं पंतप्रधान होण्याच स्वप्न मी पूर्ण करेन: अभिजीत बिचुकले
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *