महत्वाच्या घडामोडी

... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर

MahaNews LIVE
Sep 28 / 2019

महान्यूज लाईव्ह मुंबई : तुम्ही तुमच्या क्षेत्रात काम करता तसेच आम्हीही आमच्या क्षेत्रात काम करत असतो. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत जनतेसाठी प्रामाणिकपणे झटत असतो.असं असतानाही एवढं काम करून आमच्यावर खोटे आरोप लागतात. आम्ही काय माणसं -बिणस आहोत कि नाही .असे म्हणून अजित पवार भावुक झाले त्यांना अश्रू अनावर झाले .पुढे अजित पवार म्हणाले या वयात माझ्यामुळे शरद पवारांना त्रास सहन करावा लागला हे मला सहन झाला नाही ; त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा दिला. यामध्ये कोणताही गृहकलह नाही असेही पवार म्हणाले. यासगळ्यात मला शांतता हवी होती म्हणून मी मोबाईल बंद करून मुंबईत थांबलो होतो. मुंबई येथे वाय.सी.चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती.त्याठिकाणी ते बोलत होते. शरद पवार यांचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तरीही त्याचं नाव त्यात गोवल जातं . त्या संचालक मंडळामध्ये मी एकटा नाही भाजपचेही बरेच नेते आहेत त्यांचं नाव नाही मात्र अजित पवार आणि २५ हजार चा घोटाळा हे मुद्दाम अधोरेखित करून दाखवलं जात.या सगळ्याचा आणि माझ्यामुळे साहेबांना हा त्रास सहन करावा लागला; याचा त्रास मला सहन झाल नाही म्हणून मी राजीनामा दिला असं अजित पवार म्हणाले. आणि बँकेचं म्हणाल तर ती बँक संबंधित वेळेत ३०० कोटी फायद्यात होती मग घोटाळा झाला कसा? असा सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला .

... म्हणून मी राजीनामा दिला ; अजित पवारांना अश्रू अनावर
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *