महत्वाच्या घडामोडी

अजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा ; राष्ट्रवादीत राजकीय त्सुनामी

MahaNews LIVE
Sep 27 / 2019

महान्यूज लाईव्ह : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. माझ्या विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा मी देत आहे ; असा फोन अजित पवार यांनी स्वतःहून मला केला म्हणून मी तो मंजूर केला असं बागडे यांनी सांगितले.तसेच कुठलंही कारण त्यांनी दिलेलं नाही असंही ते म्हणाले. अजित पवार यांचं नाव शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं या प्रकरणात समोर आली होती.ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज शरद पवार स्वतः ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार होते मात्र ईडीनेच ई-मेल द्वारे तुम्ही चौकशीला येऊ नका आणि यापुढेही येण्याची गरज नाही .असा संदेश देण्यात आला. त्यामुळे पवार ईडी कार्यालयात गेले नाहीत. ही बातमी आज दिवसभर चर्चेत होती. त्यात अजित पवारांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा आहे. अजित पवार हे त्या शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते. या घोटाळ्यामध्ये शरद पवारांचा संबंध असू शकत नाही कारण ते ना संचालक होते, ना सभासद होते असे सर्वांनीच स्पष्ट केले होते. मात्र कुणीही अजित पवार यांच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नव्हते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांनी दिला आमदारकीचा राजीनामा ; राष्ट्रवादीत राजकीय त्सुनामी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *