महत्वाच्या घडामोडी

ऑल इंडिया युथ फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ; नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र , विद्यार्थ्यांनी दिला नारा.

MahaNews LIVE
Sep 27 / 2019

ऑल इंडिया युथ फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ; नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र विद्यार्थ्यांनी दिला नारा. महान्यूज लाईव्ह : महापरीक्षा पोर्टल रद्द करा , राज्यतील ३ लाख तसेच केंद्राकडील २४ लाख रिक्त पदे त्वरित भरा ,पोलीस भरतीची १३ हजार रिक्त पदे भरा,महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी परीक्षेमध्ये भ्रस्टाचार झाला आहे त्यामुळे ती परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा विशेष मागण्यांसह अन्य काही मागण्यांसाठी ऑल इंडिया युथ फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ( दि- २७ सप्टेंबर ) मोर्चा काढण्यात आला . बिंदू चौकामधून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला . काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणाबाजीने ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या विद्यार्थी सदस्यांनी दणाणून सोडला.या मागण्या मान्य न झाल्यास २१ तारखेला आम्ही कोणीही मतदान करणार नाही असे मत विदयार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अनुपस्थितीमुळे नायब तहसीलदार अनंत गुरव यांना देण्यात आले. या मोर्चाचे व्यवस्थापन गिरीश फोंडे ,जावेद तांबोळी, हरीश कांबळे ,मानतेश राऊत, विशाल मोरे , रवी जाधव , राहुल चव्हाण, स्नेहल कांबळे ,अभिजित लोहार ,प्रियांका कांबळे, स्वप्नील गावडे, अजय पाटील ,राखी कदम,सुरज कांबळे, रमेश पोवार,रोहित कांबळे, पृथ्वीराज शिंदें, विनय मोहिते, स्वप्नील गुंटे, निवृत्ती गुरव आदींनी केले.

ऑल इंडिया युथ फेडरेशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ; नरेंद्र-देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र , विद्यार्थ्यांनी दिला नारा.
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *