महत्वाच्या घडामोडी

रोहित पवारांचा भाजपला दणका : भाजप आमदार राम शिंदेंच्या पी.ए.नेच राष्ट्रवादीत केला प्रवेश

MahaNews LIVE
Sep 25 / 2019

रोहित पवारांचा भाजपला दे धक्का : भाजप आमदार राम शिंदेंच्या पी.ए.नेच राष्ट्रवादीत केला प्रवेश महान्यूज लाईव्ह अहमदनगर : पक्षाच्या गळतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चिंतेत होते . पण हीच चिंता आता जामखेड मतदार संघातील भाजप आमदार राम शिंदे यांना लागली आहे. कारणही तसच आहे . काही दिवसांपूर्वी जामखेड मधील भाजप आमदार राम शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता .यातून डोकं वर होतयं तोच शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांच्या पी.ए. नाच राष्ट्रवादीमध्ये घेतलं असल्याने राम शिंदेच्या अडचणीत वाड झाली आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे.या पार्श्वभूमीवर रोज नवनवीन समीकरणे जुळत आहेत.शरद पवार यांचे नातू रोहित पवार सध्या चर्चेत असून ते कर्जत जामखेड या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार मंत्री राम शिंदे यांना आव्हान देणार आहेत.दरम्यान,राम शिंदे यांना एकामागून एक धक्का बसत आहे.आता तर चक्क त्यांच्या पीए ने त्यांची साथ सोडत राष्ट्रवादीची वाट धरली आहे.अजित पवार यांनी काल अकोले येथे निर्धार मेळावा घेतला होता.दरम्यान या निर्धार मेळाव्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत राम शिंदे यांच्या पीए नेच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.तसेच,भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुध्दा राष्ट्रवादीची वाट पकडली आहे.त्यामुळे,राम शिंदेच्या अडचणी वाढल्या आहेत.

रोहित पवारांचा भाजपला दणका : भाजप आमदार राम शिंदेंच्या पी.ए.नेच राष्ट्रवादीत केला प्रवेश
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *