महत्वाच्या घडामोडी

घराणेशाहीचे राजकारण कायमचे संपवा : वंचित बहुजन आघाडी

MahaNews LIVE
Sep 24 / 2019

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व जागा मोठ्या ताकतीने लढवणार असून येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजपा-शिवसेना युती अशीच सरळ लढत असणार आहे. कोल्हापूरमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रभावी पद्धतीने धक्का देत मोठ्या फरकाने अनेक उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील येणारी निवडणूक वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजपा अशीच असणार आहे. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे तर करवीर विधानसभेमधून डॉ. आनंदा गुरव उमेदवारी दिली असून आमदार अमल महाडिक यांचा या निवडणुकीमध्ये पराजय करून वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार निवडुन आणण्यासाठी सर्व प्रकारची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

घराणेशाहीचे राजकारण कायमचे संपवा : वंचित बहुजन आघाडी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *