सातारा

साताऱ्यातून शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले ; तर मी निवडणूक लढणार नाही : उदयनराजे भोसले

MahaNews LIVE
Sep 24 / 2019

महान्यूज लाईव्ह सातारा : साताऱ्यातून शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले ; तर मी निवडणूक लढणार नाही असे मत साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांच्याबद्दल मला नितांत आदर होता, आहे आणि राहील.काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेसोबत २१ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं आजच ही घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. उदयनराजे यांच्याविरोधात खुद्द शरद पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.त्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आज वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. शरद पवारांबद्दल कालही आदर होता. आजही आहे आणि उद्याही राहील. आज महाळ आहे. पूर्वजांची आठवण काढण्याचा दिवस आहे, असं सांगताना ते भावूक झाले. त्यांच्यानंतर पवार साहेबच माझ्यासाठी आहेत. ते निवडणुकीला उभे राहणार असतील तर मी लढणार नाही. अर्ज भरणार नाही. पण दिल्लीतील बंगला आणि गाडीसाठी मला मुभा द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

साताऱ्यातून शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले ; तर मी निवडणूक लढणार नाही : उदयनराजे भोसले
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *