कोल्हापूर

निवडणुकीच्या काळात हवालाच्या पैशांवर करडी नजर .

MahaNews LIVE
Sep 24 / 2019

कोल्हापूर महान्यूज लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत बेहिशेबी पैशांचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकू नये यासाठी पोलिसांकडून हवालाच्या पैशांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. विशेषत: कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात हवालाच्या मोठ्या रकमांची देवाण-घेवाण होते. यामुळे सीमाभागात संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.मोठ्या रकमांचे व्यवहार ऑनलाइन करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र हवालामार्गे कोट्यवधींची देवाण-घेवाण सुरूच आहे. मोठ्या रकमांचे व्यवहार ऑनलाइन करणे केंद्र सरकारने बंधनकारक केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र हवालामार्गे कोट्यवधींची देवाण-घेवाण सुरूच आहे. खासगी ट्रॅव्हल्स, खासगी प्रवासी वाहनांमधून मोठ्या रकमांची अवैध वाहतूक केली जाते. निवडणूक काळात अशा रकमांचा वापर राजकीय पक्षांसह उमेदवारांकडून मतदारांना आमिष दाखवण्यासाठी होऊ शकतो. शिवाय हवालाच्या पैशांमुळे निवडणूक काळात अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळू शकते. हा धोका ओळखून पोलिसांनी हवालाच्या रकमांवर विशेष नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगलीसह गोवा आणि कर्नाटकातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बॉर्डर कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी कोल्हापुरात पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. संशयित वाहनांच्या तपासणीसाठी सीमाभागात १४ ठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. या सर्व नाक्यांवर दोन्ही राज्यातील पथके समन्वयाने वाहनांची तपासणी करणार आहेत.

निवडणुकीच्या काळात हवालाच्या पैशांवर करडी नजर .
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *