कोल्हापूर

कोल्हापूर रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात २०० सुरक्षारक्षकांसह ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

MahaNews LIVE
Sep 24 / 2019

रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात २०० सुरक्षारक्षकांसह ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात नवरात्र काळात होणाऱ्या गर्दीत भाविकांच्या सुरक्षेसाठी यावर्षी सुरक्षाकुमक वाढवण्याबाबत देवस्थान समितीच्यावतीने पोलिस प्रशासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे. दरम्यान, मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात झाली असून आज मंगळवारी सकाळी ११ वाजता अंबाबाईचे पूजा साहित्य व दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. सोमवारी मंदिर परिसरात अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. रविवारी (ता.२९) घटस्थापनेपासून अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाचे पारंपरिक विधी सुरू होणार आहेत. पहिल्या दिवसापासूनच अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावच्या शहरातून भाविक येतात. तसेच नवरात्रकाळात स्थानिक भाविकांची संख्याही वाढते. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, देवस्थानचे सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिस प्रशासन, होमगार्ड यांची २०० जणांची टीम तैनात ठेवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्व दरवाजातून दर्शनरांगेद्वारे भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येत असल्याने याठिकाणी दोन मेटल डिटेक्टर दरवाजे कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी पोलिसांची कुमक वाढवण्यात येणार आहे. उत्सवकाळात मंदिर परिसरात चारही दरवाजाबाहेर पोलिसांचा खडा पहारा असेल. पूर्व दरवाजाबाहेर दोन व अन्य तीन ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच डीएफएमडी यंत्रणा म्हणजे मेटल डोअर डिटेक्टर असणार आहेत. गेटवरील प्रत्येक सुरक्षारक्षकाकडे हॅन्ड मेटल डिटेक्टर असणार आहेत. बिनतारी संदेश यंत्रणेचे १५ संच कार्यान्वित असणार आहेत. याशिवाय शेतकरी संघ व राजवाडा पोलिस स्टेशन अशा दोन ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा कक्ष सतर्क ठेवण्यात येणार आहेत.

कोल्हापूर रविवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात २०० सुरक्षारक्षकांसह ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *