जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवराज विद्यालयाचे घवघवीत यश .
MahaNews LIVE
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवराज विद्यालयाचे घवघवीत यश . महान्यूज लाईव्ह( ऐतवडे खुर्द ): विद्यार्थ्यांनी आपले जीवन सुसह्य करण्यासाठी यशाची शिखरे नियमितपणे पादाक्रांत केली पाहिजेत यासाठी पावलोपावली भेटणारे गुरु यांच्या कृती व आज्ञेचा पावलोपावली आदर केला पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष डॉ.प्रताप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले. शांतिनिकेतन सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धे मध्ये शिवराज विद्यालयाचे घवघवीत यश संपादन केले अनुक्रमे श्रेयस यादव 75 किलो वजनी गटांमध्ये प्रथम, रूजुल जाधव 62 किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक, तर प्रीती चांदणे 39 वजनी गटात द्वितीय, कु. समृद्धी मनुगडे 33 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक, कु.पायल पाटील 43 किलो वजनी गटात द्वितीय तर कु.अंजली पाटील 46 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना वारणा शिक्षण संस्थेचे विश्वस्त अप्पासाहेब खराडे, संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील, शिवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. आर. शेटे, पर्यवेक्षक डी. डी. पाटील, कुस्तीचे क्रीडाशिक्षक व्ही. के. पुजारी तसेच पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

- Comments
- Leave your comment