मराठमोळी अभिनेत्री मनीषा केळकर इसीस 2 या इंटरनॅशनल सिनेमात
MahaNews LIVE
मराठमोळी अभिनेत्री मनीषा केळकर इसीस 2 या इंटरनॅशनल इंग्रजी सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन व लेखन युवा अभिनेता युवराज कुमार करणार असून, मनीषा एका बंगाली तरुणीची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे.बंगाली व्यक्तीरेखा असल्याने त्यासाठी बंगाली भाषेचे धडे मनिषाला सिनेमाचे संवाद लेखक हरीश भिमानी देत आहेत. या सिनेमाची पटकथा मनीषाचा भाऊ हेमंत केळकर याने लिहिली आहे. विमान अपहरण, आतंकवाद या विषयावार आधारित हा सिनेमा मनीषाचा पहिला इंग्रजी सिनेमा आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास मुंबई मध्ये नुकतीच सुरवात झाली असून अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा पाठविण्यात येणार आहे.

- Comments
- Leave your comment