कोल्हापूर

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर ता.19:- कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर सौ.शोभा बोंद्रे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सलीम नबीसो जमादार (शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले असून नुकताच सर्वोदय शिक्षण संस्था, गगनबावडा यांचे तर्फे शैक्षणिक क्षेत्रामधील देण्यात येणारा मानाचा गुरुदेव पुरस्कार मिळालेबद्दल ) द्वारकानाथ भोसले (सर) ( यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या 59 शाळांमध्ये शैक्षणिक उठावाअंतर्गत विविध शैक्षणिक उल्लेखनिय उपक्रम राबविल्याबद्द तसेच मनपा शाळांमध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून शालेय उपयोगी साहीत्य उपलब्ध करुन दिलेबद्दल) भाग्यश्री उदय शेटके ( प्रभाग क्र. 42 अंतर्गत स्वखर्चातून दोन घंटागाडया व मासिक 5,000/- पगारावर कर्मचारी उपलब्ध करुन देवून प्रभागातील काम सुरु करुन एक अनुकरणीय उपक्रम राबविलेबद्दल ) अवनी अनुप जाधव ( पुणे येथे झालेल्या इंडिया फायअर्स स्केटर्स स्पधेत 5 वर्षाखालील मुलींच्या कॉड प्रकारात सुवर्ण पदक मिळालेबद्दल ) रिध्दी निल्ले (एस.एस.सी परिक्षेत सी.बी.एस.ई कोल्हापूर बोर्डात 97.2 टक्के गुण मिळवून 3 क्रमांक व शांतिनिकेतन पब्लीक स्कूलमध्ये 2 रा क्रमांक मिळालेबद्दल ) गोमटेश राजेंद्र पाटील ( एस.एस.सी. परिक्षेत 93.40 टक्के गुण मिळविलेबद्दल) मल्हार अनिल पडवळ (एस.एस.सी. परिक्षेत 97.60 टक्के गुण मिळवून प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेबद्दल ) शिवानी संजय जाधव ( शिवाजी विद्यापिठ प्सेसमेंट सर्व्हीसेस आणि टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस यांचे वतीने घेणेत आलेल्या कॅम्पस इंटरव्हयुमध्ये तिची टाटा कन्सलटन्सी व इन्फोसिस लिमिटेड यांच्या बिझनेस प्रोसेस सर्व्हीसेस या प्रकल्पासाठी निवड झालेबद्दल ) ओमकार आबासाहेब कांबळे (एस.एस.सी. परिक्षेत 93.40 टक्के गुण मिळविलेबद्दल) शिवराज रमेश जाधव (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या उप-शिक्षणधिकारी पदाच्या परीक्षेत उर्तीण झालेबद्दल ) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, उपमहापौर महेश सांवत, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, महिला बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, सभागृहनेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, प्रभाग समिती सभापती सौ.प्रतिक्षा पाटील, सौ.छाया पोवार, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, नियाज खान, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.

महापालिका सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *