कोल्हापूर

शिवाजी तंत्र विद्यालय प्रवेशप्रक्रिया सुरु

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर, दि. 19 : महाराष्ट्र शासनाच्या शिवाजी तंत्र विद्यालय केंद्र, लक्ष्मीपुरी, पद्मा सिनेमासमोर, कोल्हापूर या संस्थेमध्ये सन 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी इयत्ता अकरावी मध्ये पुढीलप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदर संस्थेमध्ये ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी-30 जागा, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-30 जागा व इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी-30 जागा या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये ॲप्रेटींसशिप करायला मिळते. तसेच 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग डिप्लोमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. तसेच संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रमाणपत्रही देण्यात येते. तसेच या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेशी सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेते संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी 0231-2643225 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन मुख्याध्यापक, शिवाजी तंत्र विद्यालय केंद्र तथा औदयोगिक शाळा, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

शिवाजी तंत्र विद्यालय प्रवेशप्रक्रिया सुरु
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *