कोल्हापूर

चंद्रकांत (दादा) पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर, दि. 19 : राज्याचे महसुल, मदत पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. बुधवार दि. 20 जून 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंमलबजावणी जिल्हास्तरीय समिती सभेस उपस्थिती. (स्थळ : शाहू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर). दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभा व जिल्हा वार्षिक, अनुसुचित जाती उपाययोजना बैठकीस उपस्थिती. (स्थळ : ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर). दुपारी सोयीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव. सायंकाळी 5.40 वाजता निवासस्थान येथून वाहनाने लोणार वसाहत, मार्केट यार्डजवळ, कोल्हापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वाजता आगमन व करवीर दक्षिण विधानसभा मतदार यादीतील बुथ संमेलन/पदाधिकारी मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ : श्री गणेश हॉल, लोणार वसाहत (मेनन कंपनीजवळ) कोल्हापूर. सायंकाळी सोयीनुसार लोणार वसाहत येथून वाहनाने मिरज जि. सांगलीकडे प्रयाण. गुरुवार दि. 21 जून 2018 रोजी सकाळी सोयीनुसार वाहनाने कोल्हापूरकडे प्रयाण, आगमन व राखीव. सायंकाळी 5.00 वाजता कोल्हापूर निवासस्थान येथून वाहनाने कणेरी मठ, ता. करवीरकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता आगमन व स्टेट बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूरच्यावतीने आयोजित शेतकरी व बचत गट मेळाव्यास उपस्थिती (स्थळ : श्री क्षेत्र कणेरी मठ, ता. करवीर जि. कोल्हापूर). सायंकाळी सोयीनुसार श्री क्षेत्र कणेरी मठ येथून वाहनाने कोल्हापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्रौ 8.30 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

चंद्रकांत (दादा) पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *