कोंकण

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे सेट परीक्षेत सुयश

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:- गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये कार्यरत प्रा. प्रीती जाधव, प्रा. निशा केळकर आणि विभागातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी पुष्कर पाटकर यांनी जानेवारी २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांचेमार्फत घेण्यात आलेल्या आणि महाविद्यालय अध्यापनासाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता (सेट) परीक्षेत सुयश संपादन केले आहे. यशस्वी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे आणि विभागप्रमुख डॉ. महेश बेळेकर यांनी अभिनंदन केले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे सेट परीक्षेत सुयश
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *