कोल्हापूर

कळंबोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक.

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

दिनांक १८ जून २०१८ रोजी महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या बातमीवरुन कळंबोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये बल सोसायटी समोरील सिडको गार्डनचे लगतचे फुटपाथवर, सेक्टर 10, कळंबोली, नवी मुंबई येथील परिसरामध्ये एक इसम हा अफुसह कोडाईन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र बुधवंत यांनी तात्काळ मा.पोलीस आयुक्त सो., नवी मुंबई श्री. हेमंत नागराळे, पोलीस उप आयुक्त सो .गुन्हे शाखा श्री तुशार दोषी व सहा. पोलीस आयुक्त सो. श्री. निलेश राउत यांना सांगितली असता, त्यांनी सदरची बाब गंभीरपणे घेवुन मार्गदर्षनपर सुचना देवून मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र बुधवंत, सपोनि संतोश मुटकुळे, महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, पोहवा 1202/ कासम पिरजादे, पोना/2057 सचिन भालेराव, पोशी/3639 आकाश मुके, चापोशी /3580 बाबा सांगोलकर या पथकास मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी आदेशीत केले असता, इसम नामे महेंद्रसिंग भगतसिंग वय-78 वर्षे, व्यवसाय- बेकार, रा.बल को. ऑप. हौ .सोसा. बिल्डीग नं. जी 3, रूम नं. 1/2, से. 10, गुरूव्दारा जवळ, कळंबोली, नवी मुंबई राज्य- पंजाब याचे ताब्यात अंदाजे एकुण 2,43,900 रू. किंमतीचा 16 किलो 200 ग्रॅम वजनाचे कोडाईन हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:चे कब्जात बेकायदेशीररित्या बाळगला म्हणुन त्यांचेविरूध्द एन.डी.पी.एस कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 अन्वये त्यांचेवर कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजि नं II 109/2018 गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 अन्वये गुन्हा दाखल करणेत आला असून त्यास दि19/06/2018 रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. पनवेल कोर्ट येथे रिमांडकामी हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास महिला पा ेलीस उपनिरीक्षक राणी काळे, नेमणुक मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई हे करीत आहेत. सदर कारवाईमध्ये पोहवा/538 इनामदार, पोहवा/1551 ठाकुर, पोना/2063 गाढवे, यांनी उत्सपूर्तपणे सहभाग घेतला.

कळंबोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक.
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *